जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download

WhatsApp channel Join Now
Telegram Group Join Now
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download

नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण, जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download वरती प्रश्न पाहणार आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान वरती महत्त्वाचे प्रश्न मिळतील. जे की तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. यातील प्रश्न आहे मागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. पोलीस भरती, तलाठी भरती ,जिल्हा परिषद भरती, रेल्वे भरती,  इत्यादी परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावरती प्रश्न विचारले जातात. साधारणतः 25 ते 30 मार्कांसाठी प्रश्न हे विचारले जातात. यावरून स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिन्यता आपल्याला समजून येते. आणि सामान्य ज्ञानाला किती महत्त्व आहे हे सुद्धा कळते. आजच्या या पोस्टमध्ये आपण 30 असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download

प्रश्न-  मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर जनरल कोण?

 उत्तर- Lord Elphinstone

प्रश्न- लॉर्ड कॅनिंग ने कोणती परीक्षा भारतात सुरू केली?

 उत्तर-  इंडियन सिविल सर्विस.

 प्रश्न-  “सदाचार हाच खरा धर्म आहे” ही शिकवण कोणी दिली?

 उत्तर – श्री नारायण गुरु

प्रश्न-  विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले?

उत्तर – पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर

प्रश्न-   वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना ………..यांनी केली ?

उत्तर – एनी बेझंट

प्रश्न-  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुरक्षा कवच कोणी म्हटले आहे?

 उत्तर- Allen hymn

प्रश्न- इंडियन वर्कर हे साप्ताहिक कोणत्या कामगार संघटनेने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली?

 उत्तर-  इंटक

 प्रश्न-  थॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेल्या समाजसुधारकाचे नाव सांगा?

 उत्तर-  महात्मा ज्योतिराव फुले.

 प्रश्न-  संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात……… यांनी सुरू केली?

 उत्तर-  आर.डी. कर्वे.

प्रश्न-  कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

 उत्तर-  2  एप्रिल 1894

 प्रश्न- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करतेवेळी कोणत्या क्रांतीचा उल्लेख केला होता?

 उत्तर-  फ्रेंच राज्यक्रांती.

 प्रश्न-  हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते?

 उत्तर-  न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.

 प्रश्न-  “मी किती सोसू” हे पुस्तक कोणाचे आहे?

 उत्तर-  पंडिता रमाबाई

प्रश्न-  रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत?

 उत्तर-  कर्मवीर भाऊराव पाटील.

 प्रश्न-  “जातीभेद विवेकसार” हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

 उत्तर – तुकाराम तात्या पडवळ.

प्रश्न- “माणूस जेव्हा जागा होतो” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 उत्तर-  गोदावरी परुळेकर.

प्रश्न-  भारतातील शिक्षणासाठी खालीलपैकी झिरपदी सिद्धांताला कोणी विरोध केला होता?

 उत्तर-  महात्मा फुले.

 प्रश्न- सामाजिक सुधारणांसाठी तयार राहा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या परिषदेत दिला?

 उत्तर-  निपाणी.

 प्रश्न-  नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत कोणाचे आहे?

 उत्तर-  संत गाडगेबाबा.

 प्रश्न-  राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची “गुरुकिल्ली” आहे असे म्हणणारे सुधारक कोण?

 उत्तर-  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

 प्रश्न- संत तुकाराम यांच्या अभंगाचे “सेज तुका” या नावाने भाषांतर कोणत्या साहित्यिकांनी केले?

 उत्तर-  दिलीप चित्रे.

 प्रश्न- संत तुकडोबा महाराज यांची छंदोबद्ध काव्यरचना म्हणजे….. होय?

 उत्तर-  ग्रामगीता.

 प्रश्न- महात्मा फुले यांना “आधुनिक भारताचे थोर शिल्पकार” कोणी म्हटले आहे?

 उत्तर-  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

 प्रश्न- निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

 उत्तर-    दोडाबेटा.

 प्रश्न-  महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर-  गडचिरोली.

 प्रश्न- खालीलपैकी कोणते सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते?

 उत्तर-  लोणार सरोवर.

 प्रश्न- आंतरराष्ट्रीय श्रम (ILO) संघटनेचे मुख्यालय ………या ठिकाणी आहे?

 उत्तर-  जिनिव्हा.

प्रश्न- महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे?

 उत्तर-  नऊ टक्के.

 प्रश्न-  पश्चिम घाटातील कळसुबाई या अति उंच शिखराची उंची समुद्रसपाटीपासून…… एवढी आहे?

 उत्तर-  1646 मीटर.

 प्रश्न- कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे……. या प्राण्यासाठी आरक्षित आहे?

 उत्तर-  गवा. 

प्रश्न-  महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक आहे?

 उत्तर- छत्रपती संभाजी नगर.

 प्रश्न-  महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची लांबी किती किमी आहे ?

उत्तर – 382 किमी.

 प्रश्न- लोह उत्पादनातील भारतातील पहिली प्रमुख चार राज्य कोणते?

 उत्तर-  कर्नाटक छत्तीसगड ओरिसा आणि गोवा. 

मित्रांनो, जनरल नॉलेज वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download हे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा. हे प्रश्न या अगोदरच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न मी घेतलेले आहेत. या प्रश्नांची पीडीएफ फाईल तुम्हाला खाली मिळेल.  अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तेही PDF स्वरूपात तर आपल्या ब्लॉगला Follow करा आणि तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद. 

download

1 thought on “जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download”

Leave a Comment