General Knowledge Question & Answer Pdf | जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2024
नमस्कार मित्रांनो, General Knowledge Question & Answer Pdf स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन प्रश्न हे विचारले जातात. मग ते पोलीस भरती असो, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन, आरोग्य विभाग भरती, पशुसंवर्धन विभाग भरती, एकंदरीत महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही परीक्षा असो, यामध्ये लेखी परीक्षेत जनरल नॉलेज वरती 30 ते 40 मार्कसाठी प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे यावरून आपल्याला लक्षात येईल की जनरल नॉलेज हे स्पर्धा परीक्षांमध्ये किती महत्त्वाचे आहे.
त्यामुळे आज मी या पोस्टमध्ये जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2024 वरती असे महत्त्वाचे 50 प्रश्न घेणार आहे. जेणेकरून हे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. जर हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटले तर नक्की कमेंट करून सांगा. तसेच अशाच प्रश्नांसाठी आपल्या वेबसाईटला फॉलो करा. सर्व प्रश्नांच्या शेवटी प्रश्नांची पीडीएफ फाईल (PDF file) मी दिलेली आहे. General Knowledge Question & Answer Pdf मधील प्रश्न आवडले तर पीडीएफ फाईल तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये ठेवू शकता. तेही अगदी मोफत. चला तर मग बघुयात जनरल नॉलेज वरती महत्त्वाचे 50 प्रश्न.
General Knowledge Question & Answer Pdf
महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या गावी झाला ?
उत्तर -शेरवली
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी केली ?
उत्तर- मोझरी
कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महास्थवीर चंद्रमणी यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली?
उत्तर – 1956
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते?
उत्तर- यशवंत
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात झाला?
उत्तर- टेंभू
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
उत्तर – 1916
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय होते ?
उत्तर – माणिक बंडोजी ठाकूर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?
उत्तर – मध्य प्रदेश
महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
उत्तर – 1827
25 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झाला ?
उत्तर – पुणे करार
राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव श्रीमंत ……हे होते
उत्तर – जयसिंगराव घाटगे
राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर – 1894
महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?
उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणास म्हटले जाते ?
उत्तर – महात्मा फुले
महाराष्ट्रातील कोणते समाज धर्म सुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत ?
उत्तर- गोपाळ हरी देशमुख
भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण ?
उत्तर – महर्षी धोंडो केशव कर्वे
सार्वजनिक काका असे कोणाला म्हटले जाते?
उत्तर – गणेश वासुदेव जोशी
“दर्पणकार” असे कोणास म्हटले जाते ?
उत्तर – बाळशास्त्री जांभेकर
पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या स्तरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात?
उत्तर – ट्रोपोस्फियर
महाराष्ट्राचे दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?
उत्तर -700 किमी
परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?
उत्तर – निर्मल रांग
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास PDF
99% लोकांना माहीत नाही, कोणत्या गोष्टीची नोंद सिस्मोग्राफ द्वारे केली जाते ?
उत्तर – भूकंप धक्के
जगात सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र हे…… होय ?
उत्तर – जपान
आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा महाराष्ट्रातील जिल्ह कोणता आहे ?
उत्तर – मुंबई
खालीलपैकी कोणत्या पर्वताला “सह्याद्री” म्हणून ओळखले जाते ?
उत्तर – पश्चिम घाट
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे …..होय ?
उत्तर – आंबोली
महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र…… या जिल्ह्यात सर्वाधिक आहे ?
उत्तर – गडचिरोली
महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?
उत्तर – पेंच राष्ट्रीय उद्यान
आपल्या देशात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांशी पाऊस हा ……पैकी आहे ?
उत्तर – नैऋत्य मान्सून
महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र…… येथे आहे?
उत्तर- श्रीवर्धन रायगड
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने जांभा मृदा आढळते ?
उत्तर- रत्नागिरी व सिंधुदुर्ग
भारतातील पहिला लोहमार्ग ……..या सालि सुरू झाला ?
उत्तर – 1853
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर – गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती?
उत्तर – गोदावरी
खालीलपैकी कोणत्या प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते? आणि त्या प्रकल्पाला ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर- कोयना
गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर – गोदावरी नदीवर
भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर- प्रवरा
अहिल्याबाई होळकर विमानतळ या…… ठिकाणी आहे?
उत्तर – इंदोर
नोएडा हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – उत्तर प्रदेश
पहिला सहकारी साखर कारखाना म. कोनत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ?
उत्तर- अहमदनगर
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असा आहे की त्या जिल्यात सर्वात अधिक साखर कारखाने आहेत ?
उत्तर – अहमदनगर. हा जिल्हा
महाराष्ट्रात कागद बनविण्याचा मोठा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?
उत्तर – नाशिक
महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील लांब बोगदा कोठे आहे ?
उत्तर – कुरबुडे या ठिकाणी
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे?
उत्तर- सिंधुदुर्ग
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात …..क्रमांक लागतो ?
उत्तर – सातवा
केंद्रीय मगरमच्छ प्रजनन व व्यवस्थापन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – ओरिसा राज्यात
फरक्का धरण योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर – पश्चिम बंगाल
श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
उत्तर – कृष्णा नदीवर
संपूर्ण विद्युतीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर – पंजाब
पहिले कापड गिरणी भारतातील या ठिकाणी सुरू करण्यात आली?
उत्तर- मुंबई
तर मित्रांनो जनरल नॉलेज वर आधारित General Knowledge Question & Answer Pdf हे महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत. हे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये बघायला मिळतील. हेच प्रश्न सारखे रिपीट होत असतात प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील आणि इम्पॉर्टंट वाटत असतील तर आपल्या वेबसाईटला नक्की भेट देत रहा. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील.
very nice