Dhondo Keshav Karve information in Marathi – महर्षी धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ समाज सुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावाने ते सर्वांना परिचित आहेत.आधुनिक सामाजिक सुधारण्याच्या इतिहासात व विशेषता स्त्री शिक्षण विधवाविवाह याबाबतीत महर्षी कर्वे यांनी आपल्या कार्याने चिकाटीने व ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा अनुबोध पट भारत सरकार ने सरकारने काढलेला आहे.
Dhondo Keshav Karve information in Marathi
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मुरुड पासून 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेरवली येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांना मुरुड तालुका दापोली येथे शिक्षणासाठी आणले. इयत्ता सहावीची परीक्षा सातारा केंद्रात होती ती परीक्षा देण्यासाठी कर्वे पायी चालत तीन दिवस 125 महिन्याचे अंतर कापून कुंभार्ली घाटातून सातारला गेले. सातवी पर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळाली पुढच्या शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना रत्नागिरीस पाठवले. तेथे एका मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी करून ते इंग्रजी शिकू लागले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. मुंबईत शिकवण्या करून चरितार्थ भागविला. इसवी सन 1881 रोजी मॅट्रिकचे परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते मुंबईत विल्सन कॉलेजात जाऊ लागले. 1884 रोजी ते बीए झाले. त्यांनी मुंबईमधील अनेक शाळांमध्ये चार ते पाच वर्षे शिक्षकाचे काम केले.
विधवा स्त्रियांवर समाजाकडून होणारा अन्याय त्यांच्या जिव्हारी लागे. या विधवांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांच्या मनात आले. त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह करण्याचे ठरवले. व बाळकृष्ण केशव जोशी यांची गोदावरी हिच्याशी त्यांचा दुसरा विवाह 1893 रोजी झाला. त्यांच्या या पत्नीचे नाव आनंदीबाई असे होते. कुटुंबात व आश्रमात त्यांना बाया नावाने संबोधित. त्या जन्मभर पतीच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात सहभागी राहिल्या. या विवाहामुळे सनातनी मंडळींचा महर्षी कर्वे यांच्यावर रोश झाला. मुरुडच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पण कर्वे डगमगले नाहीत. पुनर्विवाहाच्या प्रश्नांसंबंधी लोकांमध्ये जागृती उत्पन्न करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्रात व्याख्यानांचे दौरे काढले. व ते आपले विचार लोकांना पटवून देऊ लागले. 1899 रोजी त्यांनी पुण्याच्या सदाशिव पेठेत “अनाथ बालिकाश्रम” सुरू केला. तोच आश्रम त्यांनी पुण्याजवळच्या हिंगणे या गावी नेला. हळूहळू या आश्रमात विधवा विद्यार्थिनींची संख्या वाढू लागली. महर्षी कर्वे यांच्या सन्मानार्थ हिंगणे गावाला कर्वेनगर व तिकडे जाणाऱ्या रस्त्यालाही त्यांचे नाव दिलेले आहे. विधवांना व सर्वसामान्य मुलींना पद्धतशीर शिक्षण मिळावे या उद्देशाने 1907 रोजी “महिला विद्यालय” नावाची एक संस्था स्थापन केली. भारतातल्या स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हे एक अत्यंत पवित्र असे देश कार्य आहे ही श्रद्धा त्यांच्या अंतरात बाणली होती ते लोकांनाही तसेच उपदेश करीत. स्त्रियांसाठी एक स्वतंत्र राष्ट्रीय विद्यापीठ असावे असे त्यांना वाटू लागले या विद्यापीठात मुलींना प्रपंच शास्त्र, आरोग्यशास्त्र पाककला, चित्रकला, गायन कला, इत्यादी स्त्री जीवनाला आवश्यक अशा सर्व विषयांचे शिक्षण मिळावे असा त्यांचा उद्देश होता.त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करून 1916 रोजी “भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना केली” या विद्यापीठाला 1920 रोजी सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाख रुपयांची देणगी देऊन त्यांच्या अभिवृद्धीला फार मोठी मदत केली. या विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. अनाथ बालिकाश्रम व महिला विद्यापीठ या संस्थांमधून महाराष्ट्रातील लाखो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे.
इसवी सन 1928 रोजी “आत्मवृत्त” हे प्रकाशित झाले. व 1955 रोजी महर्षी कर्वे यांना राष्ट्रपतींकडून “पद्मविभूषण” ही पदवी मिळाली व 1958 रोजी त्यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च बहुमान प्राप्त झाला.104 वर्षांचे दीर्घ आयुष्य भोगून अण्णा 9 नोव्हेंबर 1962 रोजी कालवष झाले.
महर्षी कर्वे यांच्या जीवनातील संक्षिप्त घटनाक्रम-
- 1881- मॅट्रिकची परीक्षा पास
- 1891- मुंबई येथून ते बीए झाले त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी furgusan कॉलेज मधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखले यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.
- 1873- कर्वे यांचा राधाबाईंशी विवाह झाला. एलफिस्टन कॉलेजमध्ये नोकरी. न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी गोखले व आगरकर यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा.
- 1893- शारदा सदन मधील गोदूबाई या विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला. मुरुड मधील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. स्त्रीमुक्तीसाठी अविरतपणे कार्य करण्याचा त्यांनी निर्धार घेतला.
- 1893- विधवा विवाह प्रतिबंध मंडळाची स्थापना.
- 1899- सदाशिव पेठेत अनाथ बालिकाश्रम सुरू केला.
- 1910- निष्काम कर्म मठाची स्थापना.
- 1916- महिला विद्यापीठाची स्थापना.
- 1952- बनारस विद्यापीठाने त्यांना डि.लीट ही पदवी दिली
हे पण वाचा- Gopal Ganesh Agarkar information in Marathi