EWS full form | EWS full form in Marathi
मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी EWS हा शब्द ऐकला असेल. आज आपण EWS full form तसेच EWS full form in Marathi, EWS म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, एकंदरीत EWS बद्दल आपण सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत.
EWS full form | EWS full form in Marathi
EWS चा फुलफॉर्म “Economically Weaker Section” असा होतो. त्यालाच मराठी मध्ये “आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक” असे म्हटले जाते.
E – Economically
W – Weaker
S – Section
EWS Certificate कोणासाठी?
भारतातील ज्या श्रेणीतील कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे ते कुटुंब ईडब्ल्यूएस श्रेणी मध्ये येते. त्या कुटुंबांना हे EWS सर्टिफिकेट मिळू शकते. पण आता तुम्ही म्हणाल हे सर्टिफिकेट कशासाठी लागते? तर त्याची आपण माहिती पुढे बघणार च आहे. भारतातील उच्चवर्णीय गरीब समाजातील लोकांसाठी 10% आरक्षण हे प्रदान करते. EWS हे आरक्षण 2019 मध्ये 103 व्या घटना दुरुस्ती व्दारे लागू केले गेले.
EWS आरक्षण मिळवण्यासाठी पात्रता
इतर समाजातील घटकांप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्यांना आरक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून केंद्र सरकारने EWS हे आरक्षण लागू केले.
खालील प्रमाणे पात्रता पूर्ण करणाऱ्यांसाठी हे आरक्षण घेता येते –
- उमेदवार हा कोणत्याही श्रेणीतील नसावा जसे – SC,ST,OBC,VJ,NT,SEBC, ETC.
- उमेदवार हा सर्वसाधारण प्रवर्गातील असावा.
- उमेदवाराचे उत्पन्न वार्षिक आठ लाखापेक्षा कमी असावे. याव्यतिरिक्त, कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन, आणि 1000 चौरस फूटा पेक्षा जास्त घर नसावे.
EWS प्रमाणपत्र कसे काढावे?
EWS सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या तलाठी कार्यालयात जाऊन तेथून उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल. तसेच रहिवासी दाखला, रहिवासी दाखला हा तुम्हाला तुमचे रेशनिंग कार्ड किंवा आधार कार्ड दाखवून तलाठी देतो. त्यानंतर तलाठ्याकडील ही कागदपत्रे घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात जावे लागते. तेथे गेल्यानंतर तेथून तुम्हाला एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म भरून तुम्ही तलाठी ने दिलेली कागदपत्रे त्याला जोडावे लागतात. आणि आवश्यक त्या ठिकाणी सर्व तुमची माहिती भरल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागतो. हे सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असते.
EWS सर्टिफिकेट अधिक माहितीसाठी…
EWS सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- बँक स्टेटमेंट
- स्वघोषणापत्र
इत्यादी प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला हे सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक आहेत.
EWS सर्टिफिकेट प्रमाणपत्र वैधता
EWS हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचे वैधता फक्त एक वर्ष असते. एका वर्षानंतर ते तुम्हाला पुन्हा renew करावे लागते. एका वर्षासाठीच हे प्रमाणपत्र दिले जाते.
निष्कर्ष
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये तुम्हाला EWS full form, EWS full form in Marathi तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र कशासाठी लागते, ते कोणासाठी दिले जाते आणि हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात. व ते कशा पद्धतीने सबमिट केले जातात. ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची वैधता किती दिवस असते. हे सर्व माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये बघितली आहे. ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र बद्दल तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न त्यांचे उत्तरे तुम्हाला मिळाली असेल. हा लेख तुम्हाला आवडला तर नक्की फॉलो करायला विसरू नका धन्यवाद.