गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar) हे एक बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाज सुधारक होते. जिवंतपणी स्वतःची अंत्ययात्रा पाहणारे ते समाजसुधारक आहेत. आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी वीस रुपये बांधून ठेवणारी समाज सुधारक. हाडाचा शिक्षक; विद्वान प्राध्यापक, व कर्तव्यदक्ष प्राचार्य म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यावर चिपळूणकरांच्या निबंधमालेचा तसेच हर्बर्ट स्पेन्सर व जॉन स्टुअर्ट या विचारवंतांचा प्रभाव होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर हे मराठी भाषेतील पहिले दोन श्रेष्ठ निबंधकार आहेत. असे वर्णन वि. स. खांडेकरांनी केले. आगरकर हे शुद्ध बुद्धिवादी विचारवंत होते. सतीची चाल, केशवपण, बालविवाह यांना त्यांचा विरोध होता. संमती विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह यांचा पुरस्कार त्यांनी केला.
गोपाळ गणेश आगरकरांची(Gopal Ganesh Agarkar) लेखन संपदा व इतर माहिती-
- अकोल्यातील वऱ्हाड समाचार या वर्तमानपत्रात लेख.
- सुधारक या साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे सूत्रधार.
- शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीत भाषांतर.
- हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटिश सरकार स्वार्थी असल्याचे स्पष्ट केले.
- गुलामगिरीचे शस्त्र हे पुस्तक त्यांनी लिहिले.
- डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक लिहिले.
- ईस्ट असेल तेच बोलेल आणि साध्य असेल ते करेल हे त्यांचे व सुधारक वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेताना विष्णुशास्त्री चिपळूण कर यांनी पुण्यामध्ये निर्माण केलेल्या जहाल विचारां च्या राष्ट्रवादी पंथास ते Lokmanya Tilak सह जाऊन मिळाले. सुधारकातील लेखातून त्यांचे सामाजिक या विविध अंगाचे सूक्ष्म निरीक्षण व सखोल चिंतन कळून येते. स्त्रियांचा पोशाख, विधवांचे केशवपण, सोवळे ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार हजामत, जोडे इत्यादी विषय जसे त्यात आहेत. तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्विक आणि धर्माचे निकटचा संबंध असलेले विषय आहेत.सामाजिक सुधारणा व कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाज हितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत. तर काही लेखातून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणाधि समस्यांविषयी मूळ विचार आलेले आहेत. समाज चिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वा चा स्थायी भाव असला तरी राजकीय विचारांच्या जहाल पणात ते लोकमान्य टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क व राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखातून स्पष्टपणे विचार जागृती घडवून आणण्याचे काम केसरी तून बाहेर पडेपर्यंत केले. आपल्या वैचारिक लेखन मराठीतील निबंध साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. मुद्देसूद प्रतिपादन ,अन्वर्थक अलंकार ,आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखन शैलीची वैशिष्ट्ये. त्यांच्या कवी, काव्य, काव्यरती, आणि शेक्सपियर, कालिदास यांसारख्या निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य व संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य काव्यातील करून रस, कवीमन आणि काव्यनिर्मिती प्रक्रिया इत्यादी संबंधिचे त्यांचे विचार या दृष्टीने लक्षणीय ठरतात. विकार विलशिताच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतर कसे करावे, यासंबंधीची मते त्यांनी मांडले आहेत. कोल्हापूर प्रकरणवरून 1882 रोजी डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगामध्ये खेळकर व विनोदी शैलीत सांगितले आहे. मराठी वाक्याचे निरनिराळे व त्यांचे परस्पर संबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे केसरीतील निवडक निबंध, निबंध संग्रह (1895) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादमीने त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. दम्याच्या विकाराने पुणे येथे त्यांचे निधन झाले.
गोपाळ गणेश आगरकर यांचे ग्रंथ-
विकार विलसित, शेक्सपियर कृत हॅम्लेट नाटकाचे भाषांतर, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, शेठ माधवदास रघुनाथ दास व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र, वाक्य मीमांसा व वाक्यांचे पृथक्करण.
प्राचार्य आगरकर यांच्या जीवनातील संक्षिप्त घटनाक्रम-
वडिलांचे नाव गणेश व आईचे नाव सरस्वती. 14 जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड जवळ टेंभू या गावी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गरीबीमुळे ते मामाकडे कराडला शिक्षणासाठी गेले. प्राथमिक शिक्षण तेथे पूर्ण केले. काही काळ कारकून म्हणून नोकरी केली. उच्च शिक्षणाचा ध्यास लागलेली दूरच्या नातेवाईका कडे ते रत्नागिरीत गेले. त्यांनी वार लावून शिक्षण शिकण्याचा प्रयत्न अयशस्वी केला.पुन्हा कराड येथे येऊन कंपाउंडरची नोकरी केली. तेथून अकोल्यात प्रयाण केले. व तेथे मॅट्रिकची परीक्षा पास झाले. शिक्षकांनी पैसे जमा करून आगरकरांना कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला पाठवले.
आगरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे-
- 1877 उंब्रजच्या अंबुताई फडके यांच्या बरोबर विवाह.
- 1878 पदवी प्राप्त डेक्कन कॉलेजमध्ये
- 1879 एम. ए करताना टिळकांबरोबर ओळख
- 1 जानेवारी 1880 लोकमान्य टिळक, निबंध मालाकार चिपळूणकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना.
- 1881 टिळक व आगरकर यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केली.
- 24 ऑक्टोबर 884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात पुढाकार.
- 1888 सुधारक हे साप्ताहिक सुरू केले
- 1892 धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्विवाह पाठिंबा
- 17 जून 1895 वयाच्या 39 व्या वर्षी दम्यामुळे मृत्यू.
हे पण वाचा- महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती
3 thoughts on “Gopal Ganesh Agarkar | Gopal Ganesh Agarkar information in Marathi”