नाना जगन्नाथ शंकरशेठ | Nana Jagannath Shankarsheth 1803-1865

नाना जगन्नाथ शंकरशेठ | Nana Jagannath Shankarsheth

नाना शंकर शेठ
नाना जगन्नाथ शंकरशेठ | Nana Jagannath Shankarsheth

Nana Jagannath Shankarsheth : 10 फेब्रुवारी 1803 या दिवशी दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात जन्म. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव. मुरकुटे उपनाम, वडील शंकरशेठ यांचा जवाहिऱ्याचा व्यापार. लहानपणी आई वारली.18 व्या वर्षी वडील वारले. लहानपणापासून शिकण्याची आवड. मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेत प्रावीण्य मिळविले.

मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे 1850-56 काळात सदस्य. मुंबई विद्यापीठाचे फेलो. जस्टीस ऑफ पीस हा ब्रिटिशांकडून बहुमान. विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण मिळावे यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे महाविद्यालय सुरू करण्यात त्यांचा सहभाग होता. मराठी माध्यम, स्त्री शिक्षण, सतीबंदी व शुद्धीकरणाचा पुरस्कार केला. ‘चिंचपोकळी गॅस’ कंपनी त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली. नाना मुंबई कौन्सिलचे पहिले सभासद (1862) होते. म्युनिसिपल अॅक्ट पास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. ते पुढील संस्थांशी संबंधित होते- रॉयल एशियाटिक सोसायटी, अॅग्रीहॉर्टीकल्चरल सोसायटी, जिऑग्राफिकल सोसायटी, व्हिक्टोरिया गार्डनं, इ.

1822 : बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सुरू केली. लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे स्मारक उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन फंड जमवून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले..

1845 : दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दोजी व वि. ना. मंडलीक यांच्या सहकार्याने ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायन्टिफीक सोसायटी’ स्थापन करून स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरच्या स्मृत्यर्थ ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’ सुरू करण्यात पुढाकार घेतला.

1852 : बाँबे असोसिएशनची स्थापना नाना शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांनी केली. हिंदी लोकांना ज्युरीमध्ये नेमावे म्हणून प्रयत्न. त्यांना ‘मुंबईचे अनभिषिक्त सम्राट’ असे म्हणत.

1857 : मुंबई विद्यापीठाची स्थापना व नाना पहिले फेलो. पुढे जगन्नाथ “शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल” नानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या मुलाने काढले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतमध्ये पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला ‘जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती’ सुरू केली.

1863 : सोनापूरची स्मशानभूमी शिवडीला हलविण्याचा प्रयत्न नानांच्या विरोधामुळे थांबला..

लोक हे देखील विचारतात-

1. नाना शंकर शेठ कोण होते?

> नाना शंकरशेठ या नावाने प्रसिद्ध तसेच  हे भारतीय परोपकारी आणि शिक्षणतज्ज्ञ होते.

2. मुंबईचे शिल्पकार कोण आहे?

> नाना शंकर शेठ.

3. नेटिव्ह स्कूल ऑफ बॉम्बे ची स्थापना कोणी केली?

> नाना शंकर शेठ यांनी

4. Bombay Native Education Society

> जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे ऊर्फ नाना शंकरशेट 1825.

हे पन वाचाआधुनिक महाराष्ट्राचा इतिहास PDF

Share this content:

Leave a Comment