Pandit Jawaharlal Nehru | Pandit Jawaharlal Nehru information in Marathi

WhatsApp channel Join Now
Telegram Group Join Now

पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांना “आधुनिक भारताचे शिल्पकार” असे म्हटले जाते. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते. 1947 ते 1964 या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी या देशाला खंबीर नेतृत्व दिले. अतिशय अडचणीच्या काळात त्यांनी देशाला योग्य ते मार्गदर्शन केले आणि अलिप्त राष्ट्रांची संघटना उभारून भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात मानाचे स्थान मिळवून दिले. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अवलंब करून देशाचे आधुनिकीकरण केले आर्थिक नियोजनाद्वारे देशाला समाजवादी समाज रचनेची देणगी देऊन मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात 1879 मध्ये झाला. त्यांचे वडील मोतीलाल हे भारतातील प्रतिष्ठित बॅरिस्टर होते. नेहरूंचे शिक्षणाची सोय घरीच करण्यात आली पाश्चात्य वातावरणात वाढलेले नेहरू पुढे इंग्लंड मधील  हॅरो आणि केब्रीज विद्यापीठात शिकले. विज्ञानाचे पदवीधर झालेल्या नेहरुंनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि ते भारतात आले. इंग्लंडमध्ये असताना त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला. व तो शेवटपर्यंत टिकून राहिला. भारतात आल्यानंतर ते गांधीजींच्या प्रभावाखाली आले. वकिली करणे ऐवजी त्यांनी स्वतःला असहकाराच्या चळवळीत सामील केले. तुरुंगवास भोगला, बोल्शेविक क्रांती चा प्रयोग  पाहून ते भारावून गेले. त्यांनी  मॉस्को ला भेट दिली. मात्र साम्यवादात पडलेली व्यक्ती स्वातंत्र्याची आहुती त्यांच्या संवेदनशील मनाला पटली नाही. राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या समाजवादाचा त्यांनी पुरस्कार केला.

Pandit Jawaharlal Nehru | Pandit Jawaharlal Nehru information in Marathi

Pandit Jawaharlal Nehru information in Marathi

1927 मध्ये ब्रुसेल येथे भरलेल्या डाव्या विचारसरणीच्या जागतिक परिषदेला ते हजर राहिले होते. त्या परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. तेव्हापासून काँग्रेस मधील समाजवादी विचारसरणीच्या गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. सुभाष चंद्र बोस ही या डाव्या गटातील प्रमुख सभासद होते. 1929 च्या लाहोर काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण स्वराज्या चा ठराव पास झाला. 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार हा दिवस गुढी तोरणे उभारून काँग्रेसचा ध्वज फडकवणे देशभर साजरा करण्यात आला. काँग्रेसमध्ये नेहरूंच्या स्वरूपात आधुनिक विचारसरणीचा चैतन्य प्रवाह सतत वाहत राहिला. युरोपात झालेले त्यांचे शिक्षण अनेक देशांमध्ये त्यांनी केलेला प्रवास त्यांचे पुरोगामी विचार वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आकर्षक प्रसन्न व्यक्तिमत्व त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमाप लोकप्रियता  लाभली. काँग्रेसमधील परराष्ट्रीय धोरणाची दिशा तेच ठरवू  लागले. गांधींचे राजकीय वारस तेच बनले. राष्ट्रीय चळवळीत त्यांना महत्त्व प्राप्त झाले. 1946 मध्ये अस्तित्वात आलेल्या हंगामी सरकारचे नेतृत्व त्यामुळेचआपोआप नेहरूंकडे  आले. स्वतंत्र भारताचे त्यामुळेच ते पहिले पंतप्रधान बनले. जग रशिया विरुद्ध अमेरिका या दोन गटात विभागले जात असताना नेहरूंनी मार्शल  टितो  आणि अब्दुल जमाल  नासेर यांच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्रांचा वेगळा गट तयार करून पंचशील तत्त्वांच्या आधारे जागतिक राजकारणाला वेगळी दिशा दिली.

रशियातील आर्थिक नियोजनामुळे प्रभावित झालेल्या नेहरूंनी भारतात पंचवार्षिक योजना सुरू केल्या. प्रथम शेती नंतर अवजड उद्योग धंदे, यावर भर देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी पाया  घातला. डॉक्टर होमीभाभा सारख्या शास्त्रज्ञांना परदेशातून बोलावून भारतात अण्वस्त्रविषयक तंत्रज्ञान निर्माण केले. तसेच त्यांनी पाश्चात्य राष्ट्रांच्या मदतीने वेगवेगळे औद्योगिक प्रकल्प भारतात सुरू केले. भारताचा आर्थिक विकास साधत असतानाच त्यांना शेजारच्या पाकिस्तान व चीन या देशांबरोबर संघर्ष करावा लागला. 1962 मध्ये चीनने भारतावर अचानक हल्ला केला. त्यात भारताचा दारुण पराभव झाला.  चीनने केलेल्या विश्वासघातामुळे पंडित नेहरू दुःखी झाले. त्यातच 1964 च्या महिन्यात त्यांचे दुःखद निधन झाले. 

लोक हे देखील शोधतात-

  1.   पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला ?

>पं. नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला.

  1. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय?

      > स्वरूप राणी थुस्सू

  1. पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान केव्हा  झाले?

> 1947 रोजी

  1.  पंडित नेहरूंना काय म्हणून संबोधले जाते?

> पंडित नेहरूंना नेहरू चाचा म्हणून संबोधले जाते.

हे पण एकदा वाचा- सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी

Leave a Comment