Police Bharti 2024 | आनंदाची बातमी !! पोलीस भरती ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवली, ही आहे शेवटची तारीख

Maharashtra Police bharti 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यात सतरा हजार सातशे पदांची रिक्त पोलीस भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या या पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याचे सुरू आहे. पण पोलीस भरतीची अर्ज करण्याची जी मुदत होती, ती राज्य सरकारने वाढवलेली आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

Police bharti 2024: राज्याच्या गृह विभागाकडून सतरा हजार सातशे पदांच्या रिक्त भरती प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. या भरतीची 5 मार्च 2024 पासून अर्ज हे ऑनलाईन भरले जात आहेत. याआधी ही फॉर्म भरण्याची मुदत 31 मार्च होती. पण आता हीच मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. ही मुदत वाढवून देणे मागचा सरकारचा हेतू हा आहे की, नव्याने देण्यात आलेले मराठा आरक्षण (एस ई बी सी) चे सर्टिफिकेट लवकर मिळत नसल्यामुळे याला मिळण्यासाठी विलंब होत असल्या कारणाने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर (website ) https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx वरती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Police Bharti 2024

Maharashtra सरकार कडून याबाबत निवेदन जारी केले गेले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पोलीस भरती 2023 मधील पोलीस शिपाई (srpf, बँड्समन, चालक पोलीस) संवर्गातील पदां साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, दिनांक 31 march पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत (महा आयटी) यांच्या Website वरती ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सर्व माहिती महा आयटी च्या वेबसाईट वरती पाहायला मिळेल.

राज्य शासनाने मराठा आरक्षण SEBC विधेयक पारित केले असून त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर सुरु करण्यात आली आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस उशिर लागत आहे. म्हणून सर्व उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची मुदत 15 april 2024 पर्यंत करण्यात आली आहे, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल आहे.तरीही सरकारकडून सांगण्यात आलेला आहे की ज्या उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही अडचण येत असल्यास त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या पावती सह अर्ज भरावा. व कागदपत्रे तपासणी वेळी प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

पोलीस भरती कागदपत्रे

पोलीस भरतीसाठी येताना खालील प्रमाणे मूळ कागदपत्रे आणणे अनिवार्य असते.

1. दहावी, बारावीचे Origional गुणपत्रिका व प्रमाणपत्र

2. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच (डोमेसाईल)

3. शाळा सोडल्याचा दाखला (L.C.)

4. आधार कार्ड Aadhar card

5. कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT, SEBC )

6. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)

7. महिलांसाठी लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)

8. विहित नमुन्यात केलेला अर्ज त्याची फोटोकॉपी.

9. तुमचे स्वतःचे चार फोटो.

Share this content:

Leave a Comment

Exit mobile version