Police bharti 2024 : पोलिस भरती 2024 साठी SEBC दाखले मिळण्याचा मार्ग झाला ‘खुला’ वेबसाइटवर हा पर्याय झाला उपलब्ध

SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या पोलीस भरतीत (Police bharti 2024 )आरक्षण देण्यात आले आहे. परंतु या प्रवर्गातील तरुणांना व तरुनी ना SEBC दाखले च मिळत नसल्याने त्यांना पोलीस भरतीत अर्ज करता येत नव्हता. पण आता हा मार्ग मोकळा झालेला आहे, सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

Police bharti 2024

Police bharti 2024

राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी SEBC कोट्यातून दहा टक्के आरक्षण मंजूर केलेले आहे. परंतु सरकारच्या दीरंगाई मुळे SEBC चे दाखले तरुणांना वेळेवर मिळत नव्हते, सध्या महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सुरू आहे. त्या भरतीमध्ये तरुणांना दाखल्याची गरज आहे आणि, पोलीस भरती ची अर्ज करण्याची मुदत 31 मार्च होती. परंतु ती मुदत आत्ता वाढवण्यात आलेली आहे. 15 एप्रिल पर्यंत त्याची फॉर्म भरण्याची मुदत वाढवलेली आहे. भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्या नंतर ही मुदत वाढवण्यात आली.

आणि आजपासून दाखले देण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण की आजपासून अर्ज करण्यासाठी अवघे 13 दिवस उरलेले आहेत. मराठा समाजातील आरक्षणासाठीची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवून 20 फेब्रुवारीला मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षण देऊ केले. आरक्षणाचा लाभ शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये होईल असेही सांगण्यात आले. त्याला अनुसरूनच 10% आरक्षणाचा लाभ पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

Police Bharti 2024 | आनंदाची बातमी

एसईबीसी चे SEBC चे प्रमाणपत्र शासनाच्या ऑनलाइन वेबसाईट वरून मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून दाखले घेण्यासाठी कार्यवाही करावी. असे कराडचे तहसीलदार विजय पवार पवार यांनी म्हटले आहे. दाखले लवकरात लवकर देण्यासाठीची कार्यवाही सुरू करत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

SEBC प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

एसईबीसी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे

1.अर्जदाराचे आधार कार्ड
2.मतदान कार्ड
3.अर्जदाराचा रहिवासी पुरावा
4.अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा
5.अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाइकांचा शाळेचा दाखला
6.त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय १८पेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो)

तर मित्रांनो अशा पद्धतीनं वरीप्रमाणेच सर्व कागदपत्रे तुमची तुमच्या जवळ असतील तर तुमचे काम अगदी जलद होणार आहे. वरील कागदपत्रे घेऊन तुम्ही ती जमा करून आपला SEBC दाखल मिळवू शकता.

Police bharti GK Questions PDF Free

Share this content:

Leave a Comment

Exit mobile version