Police bharti 2024 Maharashtra new update : महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी कोणासाठी आहे आणि कशाबद्दल आहे. ती सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊयात.
पोलीस भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीव तोड मेहनत करूनही काही विद्यार्थ्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहत होते. पण आता ही अडचण दूर झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या या उमेदवारांना उंची मध्ये सूट देण्यात आलेली आहे. जे उमेदवार एक-दोन सेंटीमीटर साठी उंची मधून बाहेर पडत होते. त्यांना ही सूट देण्यात आलेली आहे. होय ही बातमी खरी आहे. आदिवासी (ST category) तरुण-तरुणींना उंचीच्या बाबतीत पाच सेंटीमीटर ची सूट देण्यात आलेली आहे. याबाबत राज्य शासनाने शुक्रवारी दिनांक 4.09.2024 रोजी पत्रक जारी केलेले आहे.
केंद्रामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन, तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स इत्यादी मध्ये आदिवासींना पाच सेंटीमीटर ची सूट दिलेली आहे. त्याच धर्तीवर आता राज्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीत आदिवासी उमेदवारांना पाच सेंटीमीटर ची सूट देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सूट देऊन राज्यातील आदिवासी समाजाला न्याय दिला आहे.
राज्य सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांची पोलीस भरतीची वाट मोकळी झालेली आहे. महाराष्ट्रातील पद भरती मध्ये आदिवासींना उंचीच्या निकषात सूट द्यावी अशी मागणी लावून धरली होती. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने नियमात सुधारणा केली. आणि महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल यामध्ये सुधारणा नियम 2012 यात आणखी सुधारणा करण्यात आली. आता या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2024 असे संबोधले जाणार आहे.