Sane Guruji information in Marathi  | साने गुरुजी

WhatsApp channel Join Now
Telegram Group Join Now

Sane Guruji information in Marathi

Sane Guruji information in Marathi
Sane Guruji information in Marathi

४ डिसेंबर  १९९८ ते २४ डिसेंबर 1999 हे साने गुरुजींचे जन्म शताब्दी वर्ष होते. साहित्यिक, कार्यकर्ता, शिक्षक, व कुटुंब घटक अशी चतुर्वेद भूमिका निष्ठेने निभावणारी चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी होय. श्यामची आई या आत्मकथनाने गुरुजींना उदंड कीर्ती मिळवून दिली. साने गुरुजींनी शंभराच्या वर लहान-मोठे पुस्तके लिहिली असून त्यात स्वतंत्र निर्मिती असलेली त्यांची अनेक पुस्तके आहेत. कथा कादंबऱ्या यांचा त्यात अधिक भरणा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या लहानशा गावात गरीब कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंग सदाशिव साने या मुलाला लहानपणापासूनच गरिबीचे चटके बसले. आईच्या संस्कारामुळे ते स्वाभिमानी बनले. आपल्यापेक्षा जे गरीब असतील त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांचे अश्रू पुसावे  ही शिकवण त्यांना आईने दिली. दापोलीच्या शाळेत असताना वाचनाची आवड लागली. शिकण्याचे आवड असल्यामुळे लहान वयात त्यांनी घर सोडले. पुण्यात नूतन महाविद्यालयात आणि पुढे स.प महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी थोरांची चरित्र वाचली. मराठी आणि इंग्रजीतील उत्तम उत्तम साहित्य वाचले. sane गुरुजींना मराठी, हिंदी,बंगाली, तामिळ,तेलगू इत्यादी सर्व भाषा या अवगत होत्या. अभ्यासातून पांडुरंग सानेची बुद्धी तीव्र झाली. त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक आदींच्या जीवनाचा आणि विचारांचा अभ्यास केला आणि ते मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाने त्यांचे मन पेटून उठले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांचे सुंदर चरित्र लिहिले. M.A झाल्यावर  तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी गुरुजी अमळनेरला तत्त्वज्ञान मंदिरात गेले. तेथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला. त्यामुळे त्यांना मुले फार आवडत. मुलांना शिकवावेसे वाटे आणि म्हणून ते अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक झाले. तेथे ते ‘साने सर’ म्हणून विद्यार्थ्यांत करून गेले. खानदेशातील शेतकऱ्यांच्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाबड्या मुलांची वस्तीगृह चालविताना गुरुजींनी त्यांना आईचे प्रेम दिले. त्यांना वाचायला, निसर्गावर प्रेम करायला शिकवले. आणि त्यांच्या मनात देशभक्तीचे बीज पेरले. त्यांनी पंडित नेहरूंच्या आदेशाप्रमाणे 26 जानेवारी 1930 ला स्वातंत्र्याची शपथ घेऊन शाळेच्या शिक्षकांसमोर भाषण केले.

Sane Guruji information in Marathi

1930 मध्ये धुळे जेलमध्ये असताना साने सर खानदेशातील सहकारी राजबंद यांचा अभ्यास वर्ग घेत. त्यामुळे त्यांचे सहकारी त्यांना गुरुजी म्हणू लागले. व ते महाराष्ट्राचे ‘साने गुरुजी’ झाले. जेलमध्ये विनोबा भावे  यांना राजबंज्ञानसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली. sane गुरुजी  ती प्रवचने  ऐकत व लिहून काढत. विनोबा भावे यांची गीता प्रवचने साने गुरुजींनी केलेल्या टिपणामुळे तयार झाली. सत्याग्रही म्हणून शिक्षा भोगून सुटल्यानंतर sane गुरुजींनी सर्व वेळ स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचे ठरविले. आणि त्यांनी त्यावेळच्या पूर्व व पश्चिम खानदेशात गावोगाव दौरा काढून स्वातंत्र्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला. इसवी सन 1932 मध्ये स्वातंत्र्य आंदोलनात पुन्हा शिक्षा झाल्यानंतर sane गुरुजींना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले.. रोज रात्री कारागृहातील बराकीचे दरवाजे बंद झाल्यावर Sane गुरुजी आठवणी सांगत. यातूनच “श्यामची आई” हे अविस्मरणीय आणि अद्वितीय पुस्तक तयार झाले. सुटकेनंतर Sane गुरुजींनी भ्रमंती पुन्हा सुरू झाली. 1936 मध्ये खानदेशात फैजपूर येथे काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन झाले. त्यावेळेस गुरुजींनी केलेल्या भाषणामुळे हजारो तरुण स्वयंसेवक म्हणून अधिवेशनात काम करीत होते. काही जणांना वाटत होते की Sane गुरुजींना अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष करावे. परंतु गुरुजी ने ते नाकारले ते म्हणाले मी नेता नाही मी एक  सेवक आहे. अधिवेशनाच्या जागी स्वच्छतागृहाच्या सफाईच्या कामाचा मी प्रमुख होईल. व साने गुरुजींनी तेच काम केले सफाई हे साने गुरुजींचे आवडते काम होते.

हे पण पहा- Gopal Ganesh Agarkar

आणखी वाचा- Dhondo Keshav Karve information in Marathi

गांधीजींच्या विचारसरणीवर साने गुरुजींची अव्यबिचारी निष्ठा आणि अविरत श्रद्धा होती.  त्यांनी गांधींच्या हत्यानंतर 21 दिवसांचे निर्जल उपोषण केले होते. 11 नोव्हेंबर 1947 रोजी पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी खुले करण्यासाठी साने गुरुजींनी आरंभलेले प्राणांतिक उपोषण कारणीभूत ठरले. या काळात मुंबईचे हरिजन मंत्री गणपतराव तपासे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. विनोबांनी साने गुरुजींचा ‘अमृत पुत्र’ म्हणून गौरव केला होता. 11 जून 1950 ला वयाच्या 51 व्या वर्षी  साने गुरुजींची प्राणजोत मालवली. “मृत्यूचे चुंबन घेणारे महाकवी” या शब्दात आचार्य अत्रे यांनी त्यांचे वर्णन केले. लेखन, गोड गोष्टी, आवडते गोष्टी, आस्तिक, धडपडणारी मुले, श्याम, तीन मुले, भारतीय संस्कृती, सुंदर पत्रे, श्यामची पत्रे, पंडित नेहरू यांच्या भगिनी कृष्णा हाती सिंह यांच्या with no regrets या आत्मचरित्राचे त्यांनी मराठीत, ‘ना खेद ना खंत’ असे भाषांतर केले. 1938 मध्ये त्यांनी काँग्रेस या नावाचे साप्ताहिक काढले. 1948 मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. 

2 thoughts on “Sane Guruji information in Marathi  | साने गुरुजी”

Leave a Comment