सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक ज्येष्ठ नेते होते त्यांचा जन्म. गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील करमसद खेड्यातील एका शेतकरी कुटुंबात 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. स्वतंत्र भारताचे ते पहिले उपपंतप्रधान होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी एका कठोर शिक्षकाविरुद्ध संप घडवून आणला होता. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा पास करून गोदरा येथे वकिली सुरू केली. ( 1910) रोजी ते इंग्लंडला गेले व बॅरिस्टर ची परीक्षा पहिल्या क्रमांकाने पास झाले. अहमदाबादला परत येऊन त्यांनी वकिली सुरू केली. सुरुवातीला टिळकांच्या जहाल पक्षात त्यांनी काही काळ व्यतीत केला. परंतु महात्मा गांधी अहमदाबादला आल्यानंतर वल्लभभाईंना त्यांचा सहवास लाभला व त्यांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन घडले. (1917) महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष तर वल्लभाई पटेल चिटणीस बनले. 1917-18 च्या खेडा सत्याग्रहात वल्लभभाईंनी मनापासून भाग घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळे सत्याग्रह यशस्वी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष बनले आणि नागरिक प्रशासनात त्यांनी अनेक सुधारणा केल्या.
Sardar Vallabhbhai Patel
महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी हिरीने भाग घेतला वकिली सोडून पूर्णपणे सार्वजनिक जीवनाशी एकरूप झाले. या सुमारास त्यांनी दहा लाखाचा निधी उभारून गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. 1921 मध्ये ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. १९२८ च्या बारडोली सत्याग्रहाची सर्व जबाबदारी वल्लभभाईकडे होती. या सत्याग्रहात त्यांना नेत्रदीपक यश प्राप्त झाले. त्यांना भारतभर प्रसिद्धी मिळाली व त्यांना “सरदार” या उपाधीने ओळखले जाऊ लागले. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तुरुंगवास पत्करला. त्यांचे कर्तुत्व आणि कार्याचा विचार करून त्यांना कराची काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले. 1931- 1936 मध्ये त्यांना प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले. 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. “चले जाव” चळवळीत त्यांना अटक झाली. 15 जून 1945 रोजी त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले.
1946 च्या हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री या महत्त्वाच्या पदावर त्यांची नेमणूक झाली. घटना समितीचे ते सभासद होते. स्वतंत्र भारताचे ते पहिले गृहमंत्री होते. गृहमंत्री असताना त्यांनी केलेली सर्वात महत्त्वाचे कामगिरी म्हणजे संस्थानांचे विलीनीकरण ही होय. सुमारे 550 संस्थाने त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे भारतात विलीन झाले. हैदराबाद संस्थान त्यांनी पोलीस कारवाई करून भारतात विलीन करून घेतले. या कार्यात त्यांना सनदी अधिकारी गृहसचिव व्हीपी मेनन यांचे बहुमूल्य सहाय्य लाभले. सोरटी सोमनाथ येथील मंदिराचा त्यांच्या प्रयत्नांमुळे जीर्णोद्धार करण्यात आला. सर्व धर्मियांना आणि अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश खुला करण्यात आला. ते गृहमंत्री असताना महात्मा गांधींचा 30 जानेवारी 1948 रोजी खून झाला. त्यामुळे ते अतिशय दुखी झाले. १२ डिसेंबर 1950 रोजी मुंबईत त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एकात्म भारताचे शिल्पकार या दृष्टीने ते इतिहासात अजरामर झालेले आहेत. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे त्यांना “भारताचे पोलादी पुरुष” म्हणून ओळखले जाते. भारतीय बिस्मार्क असा त्यांचा गौरवास्पद उल्लेख लंडन टाईम्स ने त्यांना श्रद्धांजली वाहताना केला होता.
हे पण महत्त्वाचे वाचा- महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती
लोक हे देखील विचारतात-
1. सरदार वल्लभभाई पटेल यांचे पूर्ण नाव काय?
> वल्लभभाई झवेरभाई पटेल
2. सरदार वल्लभ भाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली?
> सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी महात्मा गांधींनी दिली होती.
3. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क का म्हटले जाते?
> त्यांनी विभाजित भारताचे तुकडे झालेले भाग म्हणजे संस्थानिक राज्य आणि ब्रिटिश भारत एक राष्ट्र बनवण्याच्या आणि भारताचे बालकनीकरण रोखण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना भारताचे बिस्मार्क म्हणून ओळखले जाते.
4. भारतातील लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते?
> भारतातील लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते.
5. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली कोणती चळवळी यशस्वी झाली?
> बारडोली सत्याग्रह
1 thought on “Sardar Vallabhbhai Patel | सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी”