महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पत्नी Savitribai Phule यांनी आयुष्यभर सहकार्य दिले. स्त्रीमुक्ती आंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रणी म्हणून महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास त्यांची दखल जरूर घेतली जाईल. महात्मा ज्योतिरावांची सगळी विचारसरणी त्यांनी आत्मसात केली होती ज्योतिरावांच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाढली त्यांनी काव्यरचना केली आहे. काव्य फुले1854 ,मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी 1891, बावनकशी सुभोधरत्नाकर 1892, जोतिबांची भाषणे हे त्यांचे साहित्य उपलब्ध आहे.
Savitribai Phule
Savitribai Phule चा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. पुण्यापासून सुमारे 50 किमी दूर पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळ पासून पाच किमी वर असलेल्या नायगाव या गावात झाला. सावित्रीबाई या खंडोजी नेवसे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. 1840 रोजी त्यांचा जोतिरावांशी विवाह झाला. महात्मा फुले यांनी मौलिक व प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके आणि पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्या वेळच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण व नागरी अशा दोन प्रकारच्या सामाजिक जीवनात ब्राह्मणांचे धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्व होते. जोतिरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिले. सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फरार बाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. सावित्रीबाई या आद्य भारतीय शिक्षका व मुख्याध्यापिका होत. ज्योतीराव-सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्य 1848 रोजी सुरू केले होते. असे ज्ञानोदय व बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्रांवरून सिद्ध होते. . ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर १८ डिसेंबर 1890 रोजी ज्ञानोदयाने ज्योतीरावांवर श्रद्धांजलीपर अग्रलेख लिहिला होता.
1877 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. सावित्रीबाई व ज्योतिरावांनी निधी जमवला होता. डॉक्टर शिवप्पा सारख्या मित्राच्या मदतीतून धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रम सुरू केला. लहान मुलींच्या संरक्षणासाठी या संस्थेने बळवंत सखाराम कोल्हे शिपायाचे नियुक्ती केली. ब्राह्मण विधवांच्या केशव पणाविरुद्ध नाविकांना संघटित करून त्यांचा संप घडवून आणण्याचा कल्पक उपक्रम दिनबंधूचे संपादक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी घडवून आणला त्या मागची प्रेरणा सावित्रीबाई होत्या. सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात एक वस्तीगृह चालविले होते. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी व रमाबाई रानडे त्यांच्या भेटीस येत. सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या खांद्या कार्यकर्त्या होत्या. या समाजाने पुरोहित नाकारून साध्या पद्धतीचे हुंड्याशिवाय कमी खर्चातले विवाह लावायचा कार्यक्रम हाती घेतला. पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 रोजी लावण्यात आला.
हे पण एकदा वाचा – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
ज्योतीरावांना जुलै 1887 मध्ये पक्षाघाताचा आजार झाला. त्यांचे संपूर्ण उजवे अंग लुळे पडले. Savitribai Phule नी त्यांची अहोरात्र शुश्रुषा केली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे आजारपणातच निधन झाले. ज्योतीरावांच्या निधन समयी सावित्रीबाई त्यांच्याजवळ होत्या. ज्योतिरावांनी आपल्या मृत्युपत्रात आपले दहन न करता मिठात घालून पुरावे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यासाठी घरामागे एक खड्डा खोदून घेतला होता. परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवासी जागेत दफन करण्याची परवानगी नाकारल्याने ना इलाजाने ज्योतिरावांवर अग्नी संस्कार करावे लागले. अंत्ययात्रेच्या समयी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने जोतिरावांचे पुतणे आडवे आले आणि यशवंतला विरोध करू लागले. सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व त्यांनी स्वतः टिटवे धरले. अंत्ययात्रा त्या अग्रभागी चालल्या. व त्यांनी स्वहस्ते जोतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यानंतर मामा परमानंद व जोतिरावांचे स्नेही रामचंद्र राव धामणसकर यांच्या मदतीवर सावित्रीबाई व यशवंतराव फुले गुजरात करीत होते. 10 फेब्रुवारी 1892 रोजी सयाजीराव गायकवाड महाराजांनी सावित्रीबाईंच्या मदतीसाठी एक हजार रुपयांचा धनादेश धामणसकर यांच्याकडे दिला होता. 1893 रोजी सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष स्थान सावित्रीबाईंनी भूषवले. 1896 च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे प्लेगमुळे निधन झाले.
2 thoughts on “Savitribai Phule 1831-1897”