Sanctuaries and Wildlife Conservation |अभयारण्य व वन्यजीव संरक्षण

Author:

Sanctuaries and Wildlife Conservation – अभयारण्य  व वन्यजीव संरक्षण

महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारचे प्राणी आढळतात. सह्याद्री पर्वत, कोकणपट्टी, पठारी भागातील  डोंगर रांगा. सातपुडा पर्वत इत्यादी प्रदेश वन्यप्राण्यांची निवासस्थान  आहेत. महाराष्ट्रातील वनात सुमारे 85 सस्तन प्राण्यांचे 100 गुण अधिक सरपटणारे प्राण्याचे व 700 पेक्षा अधिक माशांच्या 25 पेक्षा जास्त कीटकांच्या प्रजाती आढळतात. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागा अंतर्गत वन्यजीव शाखेची वेगळी शाखा कार्यरत आहे. प्रधान मुख्य संरक्षक या दर्जाचेच प्रधान मुख्यसंरक्षक वन्यजीव हे राज्याच्या वन्यजीव शाखेचे प्रमुख आहेत. त्याचे मुख्यालय “नागपूर” येथे आहे. कायद्याच्या परिभाषेत त्यांना मुख्य वनरक्षक असे संबोधतात. वनरक्षक यांना अतिरिक्त मुख्य वन्यजीव रक्षक, उपवनसंरक्षक यांना उपमुख्य वन्यजीव रक्षक व सहाय्यक वनसंरक्षकांना वन्यजीव रक्षक व वनक्षेत्रपाल यांना सहाय्यक वन्यजीव रक्षक असे संबोधले जाते. राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प व इतर वन्यजीवांसाठीची क्षेत्रे यातील वन्यजीवांचे संरक्षण व संगोपन करण्याची जबाबदारी या शाखेकडे असते. 

अभयारण्य व वन्यजीव संरक्षण
Sanctuaries and Wildlife Conservation | अभयारण्य  व वन्यजीव संरक्षण

Sanctuaries and Wildlife Conservation – अभयारण्य  व वन्यजीव संरक्षण

राज्यातील नैसर्गिक विविधता योग्य प्रकारे जतन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य या सुरक्षित क्षेत्राचे एकूण क्षेत्र हे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या कमीत कमी 4 टक्के असावे असे केंद्र शासनाचे धोरण आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 मध्ये झाली, तेव्हा राज्यात चंद्रपूर येथील ताडोबा राष्ट्रीय उद्यान व कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य अस्तित्वात होते. त्यावेळी वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने मुंबई वन्यजीव व पक्षी अभयारण्य संरक्षण अधिनियम 1951 यानुसार कामगार चालत असे. यामध्ये राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने क्षेत्रीय व्यवस्थापनासाठी 5 सप्टेंबर 1968 मध्ये बोरिवली राष्ट्रीय उद्यानासाठी “सहाय्यक वनसंरक्षक हे महाराष्ट्रातील पहिले वेगळे पद” निर्माण करण्यात आले. 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 केंद्र शासनाने पारित केला व त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात जून 1973 पासून सुरू झाली. यानंतर वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र शासनाने 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची योजना अस्तित्वात आली. 

  • मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो म्हणून तेथे काटेरी वृक्षांची जंगले आढळतात.
  • वनक्षेत्राच्या उतरत्या क्रमानुसार जिल्ह्यांचा योग्य क्रम- गडचिरोली, अमरावती,ठाणे, चंद्रपूर
  • महाराष्ट्रात सर्वात दाट जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे.
  •  महाराष्ट्रात चंद्रपूर/ गडचिरोली या भागात पानझडी जंगल या प्रकारचे जंगल आढळते.
  •  महाराष्ट्रामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वात अधिक आहे.

काही अभयारण्याची ठळक वैशिष्ट्ये-

  • अभयारण्यंपैकी भीमाशंकर (जिल्हा पुणे) हे अभयारण्य शेकरू या खारीकरीता प्रसिद्ध आहे. त्यास आपण राज्य प्राणी म्हणून घोषित केलेले आहे. 
  • कर्नाळा (जिल्हा रायगड) हे महाराष्ट्रातील सर्वात जुन असलेले अभयारण्य पक्षांकरिता प्रसिद्ध आहे. देशातील बहुतांशी पक्षी अभयारण्य ही पानवट्याच्या पक्षाशी निगडित आहे. 
  •  मुंबई महानगरीस पाणीपुरवठा करणारे तानसा जलाशय व मोडक सागरजलाशयाच्या पाणलोट क्षेत्राचे संरक्षण करणारे अभयारण्य म्हणून  तानसा अभयारण्य ओळखले जाते.
  • रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिराच्या माजी नवाबाचे राखीव शिकार क्षेत्र शासनाने फणसाड अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे.
  •  महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य म्हणून मालवण सागरी अभयारण्य प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला या अभयारण्याच्या क्षेत्रात येतो.
  • छत्रपती शाहू महाराजांना शिकारीसाठी राखून ठेवलेले प्रथम दाजीपूरचे अभयारण्य पुढे त्याचे रूपांतर करून राधानगरी असे करण्यात आले. या अभयारण्यात गवा, या प्राण्याकरिता हे प्रसिद्ध आहे.
  • नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या वन्य प्राण्यांच्या जातीत माळढोक या पक्षाचा समावेश होतो. त्याचे संरक्षणासाठी अहमदनगर जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील नानज या परिसरात माळढोक पक्षी अभयारण्य जाहीर केलेले आहे.
  • अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी हा भाग काळवीट जातीच्या देखण्या हरणांकरिता प्रसिद्ध आहे.
  • महाराष्ट्राचे भरतपुर म्हणून नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य ओळखले जाते.
  • राष्ट्रीय पक्षी मोर याचे संरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर अभयारण्य घोषित करण्यात आले आहे.

आधुनिक भारताचा इतिहास 50 प्रश्न व उत्तर 

Savitribai Phule 1831-1897

सह्याद्री विभागात राज्यातील सुमारे 20 टक्के वनक्षेत्र, सातपुडा विभागात 13 टक्के वनक्षेत्र, पूर्व विदर्भात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 47 टक्के. मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे राज्यातील 4.3% वनक्षेत्र आहे. आर्थिक दृष्ट्या उपयुक्त वने पूर्व विदर्भातील अल्लापल्ली, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागात आंबोलीच्या पायथ्याशी आहेत.

महत्वाचे अभयारण्य-

  1. चांदोली अभयारण्य-  सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात 214 चौरस कि.मी विस्ताराचे हे अभयारण्य आहे. यात अस्वल, बिबटे, वाघ, गवे, कोल्हे, ससे, चितळे, सांबर, व निरनिराळे पक्षी मोठ्या संख्येने दिसून येतात.
  2.  ताडोबा राष्ट्रीय उद्यान- हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असून या उद्यानाचे एकूण क्षेत्र 120 चौरस कि.मी इतके आहे. या उद्यानात लहान-मोठे अनेक तलाव असून ताडोबा हा सर्वात मोठा तलाव आहे. या उद्यानात चितळ हरीण सांबर वाघ चिंकारा मगरी गवी इत्यादी वन्य प्राणी आहेत.
  3.  नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान-  हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात असून याचे क्षेत्र 135 चौरस कि.मी आहे यांच्या मध्यभागी मोठा तलाव असून उद्यानामध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात यामध्ये नीलगाय, भेकर, अस्वल, बिबटे इत्यादी वन्य प्राणी आढळतात.
  4.  कोयना अभयारण्य- सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या परिसरात 424 चौरस कि.मी क्षेत्र असलेले महाराष्ट्रातील एक मोठे अभयारण्य आहे. यामध्ये अस्वले, बिबटे, गवे, रानडुक्कर, पक्षी इत्यादी वन्य प्राणी आढळतात.
  5.  मायणी पक्षी अभयारण्य- सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे पक्षांसाठी हे अरण्य या अरण्यास इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य असे नाव दिले आहे. यामध्ये सायबेरिया आणि आशिया खंडाच्या अति दूर भागातून आलेले स्थलांतरित पक्षी आढळतात. या ठिकाणी पक्ष निरीक्षणासाठी दुर्बिणीचे व्यवस्था केलेले आहे.
  6.  कर्नाळा पक्षी अभयारण्य- महाराष्ट्रातील हे पहिले अभयारण्य असून रायगड जिल्ह्यात मुंबई पासून 60 किमी अंतरावर आहे. या अभयारण्यामध्ये एकूण 150 जातीचे पक्षी आढळतात. घार, सुतार पक्षी, बहिरी ससाणा, मोर, दयाळ, भारद्वाज, शहाबाज, इत्यादी  जातीचे पक्षी आढळतात. येथून जवळच कर्नाळा किल्ला प्रसिद्ध आहे.
  7.  किनवट अभयारण्य-  किनवट अभयारण्य हे नांदेड जिल्ह्यात असून पैनगंगा नदीच्या खोऱ्यातील हे अभयारण्य नांदेड व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यात सुमारे 325 चौरस किमी क्षेत्रात पसरलेले आहे.. यामध्ये बिबटे,  वाघ, अस्वल, रानडुक्कर, लांडगे, चितळ, चिंकारा, इत्यादी प्राणी आढळतात.

हे पण एकदा वाचा- Dhondo Keshav Karve information in Marathi | महर्षी धोंडो केशव कर्वे

 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *